Home ठळक बातम्या तुमचे 33 खासदार बिनविरोध आले ते चालले, महायुतीचे 20 नगरसेवक बिनविरोध आले...

तुमचे 33 खासदार बिनविरोध आले ते चालले, महायुतीचे 20 नगरसेवक बिनविरोध आले तर लोकशाहीची हत्या कशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

कल्याण पूर्वेतील महायुतीच्या विजय संकल्प सभेतून विरोधकांवर टीकास्त्र

कल्याण दि.7 जानेवारी :
एकेकाळी देशाच्या लोकसभेमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या 35 खासदारांपैकी एकट्या काँग्रेसचे 33 खासदार होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी आमचे 20 नगरसेवक बिनविरोध निवडून दिले तर लोकशाहीची हत्या कशी? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी आरसा पाहण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (CM Devendra Fadnavis slammed the opposition over claims of “murder of democracy” on unopposed Mahayuti wins)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीच्या प्रचारार्थ कल्याण पूर्वेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘विजय संकल्प सभेमध्ये’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यासह कल्याण डोंबिवली आणि एम एम आर रिजनमध्ये सुरू असलेल्या आणि भविष्यातील पायाभूत सोयी सुविधांच्या विकासकामांचे दाखले देत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय महायुतीला मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इतिहासातील सर्वात मोठा विजय महायुतीला मिळवून द्या…

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पूर्वीच्या निवडणुकीत आम्ही भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढलो होतो. त्यावेळी तुम्ही महायुतीचे 94 नगरसेवक निवडून दिले होते. परंतु आता या निवडणुकीत आम्ही दोघेही एकत्र लढत असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यापूर्वी कधीही मिळाला नव्हता इतका मोठा विजय मिळवून द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित नागरिकांना केले.

एमएमआर क्षेत्रामध्ये 4 लाख कोटीची विकासकामे…

तर आज मला आनंद वाटतो की मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघांनी मिळून या एम एम आर डी ए च्या माध्यमातून या एम एम आर क्षेत्रामध्ये 4 लाख कोटी रुपयांची काम आता सुरू केलेली आहेत. ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या, रस्त्यांच्या योजना, मेट्रो अशा अनेक गोष्टी याठिकाणी आपण एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

तिकीट न वाढवता मेट्रोसारखे एसी कोचेस आपल्या लोकल ट्रेनमध्ये…

तर मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनच्या डब्यांनाही आता दरवाजे लागणार असून त्या सर्व लोकल एसी होणार आहेत. ते एसी होणार आहेत, त्याठिकाणी मेट्रोसारखे कोचेस आपल्या लोकल ट्रेनमध्ये आम्ही आणणार आहोत, हे एसी कोच झाल्यानंतर सेकंड क्लासच्या तिकिटाचे दर एक रुपयाने देखील वाढणार नाहीत त्याच दरामध्ये आपल्याला एसी कोचमध्ये प्रवास करता येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. तसेच मुंबईपाठोपाठ आता एम एम आर रीजनमध्येही सिंगल ॲपवर संपूर्ण सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आणण्यात YENAR आहे. म्हणजे तुम्ही एक तिकीट काढलं की त्या एका तिकिटावर मेट्रो, रेल्वे आणि महानगरपालिकेच्या बसेसमध्ये प्रवास करू शकाल असे सांगितले.

सुखकर प्रवासासाठी अनेक चांगली विकासकामे…

त्याशिवाय आपली जी काही नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात ईस्ट-वेस्ट कनेक्टिव्हिटी देखील तयार करणार आहेत अशा पद्धतीने याचा प्लॅनिंग आपण केलेला आहे आज कल्याण डोंबिवली असो की एमएमआर रिजनमध्ये राहणारा कोणी असो. प्रवासात त्याच्या जीवनाचा खूप मोठा वेळ जातो हा प्रवास छोटा झाला पाहिजे तो वेगवान झाला पाहिजे आणि तो सुखकर झाला पाहिजे या दृष्टीने अनेक चांगले विकासकामे हे आता आपण हातामध्ये घेतलेले असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ऐरोली काटई नाका फ्री वे हा खऱ्या अर्थाने गेमचेंजर…

तर ऐरोली काटई नाका फ्री वे हा खऱ्या अर्थाने कल्याणच्या विकासाचा एक गेमचेंजर होणार आहे. आणि त्यानिमित्ताने अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. झोपडपट्टीचा पुनर्विकास, क्लस्टरच्या योजना, 27 गावांचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या गोष्टी झाल्यानंतर एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे शहर उत्तम अशा प्रकारची महानगरपालिका म्हणून आपल्याला इथे पाहता येईल याठिकाणी एक मोठं केंद्र बीकेसीसारखा आपण करणार आहोत, या बिजनेस हबमध्ये एक व्यवसाय केंद्र आपण तयार करणार आहोत, बुलेट ट्रेनमुळे याठिकाणी एक नवीन इकोसिस्टीम तयार होत असून त्यामुळे हजारो लोकांकरता रोजगार या आपल्या भागामध्ये तयार होणार आहे.

महापालिकेच्या दोन रुग्णालयांचा पुनर्विकास करण्यासह कल्याण डोंबिवलीला एक मेडीकल कॉलेज द्या – खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शास्त्रीनगर हॉस्पिटल आणि रुक्मिणीबाई हॉस्पिटलचे गेली अनेक वर्ष  कल्याण डोंबिवलीला सेवा पुरवत आहे. त्यांचे रीडेव्हलपमेंट करणंदेखील तितकाच गरजेचे असल्याचे सांगत अंबरनाथमध्ये आपण मेडिकल कॉलेज मंजूर केले आहे.  कल्याण डोंबिवली एवढे मोठा शहर आहे, त्याच्यामध्ये दोन दोन हॉस्पिटल्स असून त्यापैकी एक 220 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल सुरू होत आहे. ते पाहता भविष्यामध्ये एक मेडिकल कॉलेज हे  कल्याण डोंबिवलीकरांना आपण द्यावे जेणेकरून या कल्याण डोंबिवलीच्या लोकांना इथल्या इथे सर्व तज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील अशी महत्त्वाची मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी केली. तसेच खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या ऐरोली काटई फ्री वे, रिंग रोडसारख्या महत्वाकांक्षी विकासकामांचा उल्लेखही आपल्या भाषणात केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा