Home ठळक बातम्या सचिन पोटे यांच्या येण्याने टीम खा.श्रीकांत शिंदे आणखी मजबूत, महापालिका निवडणुकीत महाविकास...

सचिन पोटे यांच्या येण्याने टीम खा.श्रीकांत शिंदे आणखी मजबूत, महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे घोडे फरार होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह मनसे नगरसेवक आणि अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

कल्याण दि.18 डिसेंबर :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा टांगा पलटी झालाय येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांचे घोडेही फरार होतील अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला. तसेच सचिन पोटे एक लढवय्या कार्यकर्ता असून जिथे काम केले तिकडे प्रामाणिकपणे केले अशा शब्दांत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन पोटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर झालेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात सचिन पोटे, जान्हवी पोटे, मनसेचे माजी नगरसेवक कौस्तुभ देसाई, कस्तुरी देसाई यांच्यासह काँग्रेस, मनसे आणि उबाठा पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेत पक्षप्रवेश सोहळ्यात निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. (Deputy Chief Minister Eknath Shinde remarked that the cart of the Maha Vikas Aghadi had already overturned in the previous elections)

त्यांच्या टिका, टोमण्यांकडे आपण लक्ष देत नाही…
राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत असताना आपल्यावर कोण टिका करतंय, टोमणे मारत आहे, याकडे अजिबात लक्ष देत नाही. आरोपाला आरोपातून नाही कामातून टीकेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर देतो अशा शब्दांत त्यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकाकारांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलेआ

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची टीम आणखी मजबूत…
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीचीच टीम जिंकणार ही काळया दगडावरची रेघ असून सचिन पोटे यांच्या पक्षात येण्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम आणखी मजबूत झाली आहे. या टीममध्ये आधीच धोनी, विराट, रोहित होते त्यात आता सचिन पोटे यांचीही एन्ट्री झाली असून येणाऱ्या निवडणुकीत आपली महायुती जिंकणार यामध्ये कोणताही संशय नसल्याचा विश्वास व्यक्त केला. कारण सर्वसामन्यांना न्याय द्यायचा असेल आणि विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष कोणी मालक नाही, नोकर नाही. सचिन पोटे आमच्याकडे आल्याने शिवसेनेला मोठी ताकद मिळणार असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल अशा शब्दांत सचिन पोटे यांना आश्वस्त केले.

ज्या काँग्रेस पक्षात प्रामाणिक काम केले, त्याच्यापेक्षा अधिक उर्मीने शिवसेनेत काम करीन – सचिन पोटे
यावेळी पक्ष प्रवेशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सचिन पोटे यांनी आपल्या शायराना अंदाजात सुरुवात केली. आपण 25 वर्ष काँग्रेसमध्ये हाडाचा कार्यकर्ता होतो, प्रामाणिक काम केलं. यापुढे शिवसेनेचे नक्कीच चांगल्या प्रकारे काम करू. खूप भावनिक क्षण होता काँग्रेस सोडल्यावर लोकांशी चर्चा केल्यावर त्यांनी शिवसेना नाव सांगितले. इथल्या नगरसेवकांच्या कामाची पद्धत माहिती आहे, फारसा त्रास होणार नाही, कोणत्याही कमिटमेंट शिवाय आलोय अशा शब्दांत सचिन पोटे यांनी आपली भावना व्यक्त केली. तर आपण काँग्रेस नगरसेवक असतानाही खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मोठा निधी देण्याचे काम केल्याचे सांगत अधिक उर्मीने शिवसेनेत काम करून पक्ष संघटना वाढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यांचा झाला पक्षप्रवेश…
सचिन पोटे, जान्हवी पोटे, किशोर देसाई, कस्तुरी देसाई, विमल ठक्कर, शकील खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आशा रसाळ, प्रविण साळवे, शकील खान, लिओ, माजी नगरसेवक फैजल जलाल, यतिन जावळे आदी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी गोपाळ लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, उपनेत्या विजया पोटे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर, शहरप्रमुख रवी पाटील, निलेश शिंदे, जिल्हाध्यक्ष छाया वाघमारे, संजय पाटील यांच्यासह उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा