Home ठळक बातम्या मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल – शिवसेना...

मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल – शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव

कल्याण पश्चिमेत पॅनल क्र.6 मध्ये उमेश बोरगांवकर, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, संकेश भोईर यांच्यासाठी प्रचारसभा

कल्याण दि.10 जानेवारी :
भाजपच्या नादाला लागून मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहत येथे पॅनल क्रमांक 6 मधील पक्षाचे उमेदवार उमेश बोरगांवकर, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, संकेश भोईर यांच्यासाठी जाधव यांनी काल प्रचारसभा घेतली. (Do Not Hand Over Mumbai to the BJP, or You Will Be Forced to Regret It,” Warns Shiv Sena (Uddhav Thackeray Faction) Leader Bhaskar Jadhav)

देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका 1952 मध्ये सुरू झाल्या तेव्हापासून आजतागायत इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार कधीही बिनविरोध निवडून आले नाहीत. सत्ताधारी पक्षाने अशी कोणती कामगिरी केली आहे की त्यांचे इतके सगळे उमेदवार बिनविरोध आले? आणि तेही केवळ सत्ताधारी पक्षाचेच कसे येऊ शकतात? असे सवाल उपस्थित करत ही सगळी परिस्थिती पाहता सत्ताधारी पक्षाकडून लोकशाही मारण्याचे काम सुरू असल्याचा घणाघाती आरोपही भास्कर जाधव यांनी यावेळी केला.

तर कल्याण डोंबिवली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा