Home ठळक बातम्या दारावरची बेल वाजवू नका! आमचेच नाही तर अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ….यांनाच ;...

दारावरची बेल वाजवू नका! आमचेच नाही तर अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ….यांनाच ; कल्याण पूर्वेतील ‘पुणेरी टाईप’ पाटी ठरतेय चर्चेचा विषय

कल्याण | दि.12 जानेवारी :
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध उमेदवारांच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, कल्याण पूर्वेत एका घराबाहेर लागलेल्या ‘पुणेरी टाईप’ पाटीन मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पाटीवरील मजकूर इतका स्पष्ट, तिरकस आणि थेट आहे की, काही राजकीय उमेदवारांचा हिरमोड झाला असताना काहींच्या मात्र चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. (“Do Not Ring the Doorbell!” Not Just Our Family, the Entire Building Will Vote Only for … ; ‘Puneri-Style’ Signboard in Kalyan East Sparks Discussion)

पुणेरी पाट्यांची खासियत म्हणजे — कोणताही मुलाहिजा न बाळगता नेमक्या शब्दांत दिलेला संदेश. फेरीवाले असोत, पत्ता विचारणारे असोत किंवा कुणीही अनावश्यक त्रास देणारे असोत, पुणेरी पाट्या आपले काम चोखपणे बजावतात. हाच पुणेरी बाणा आता थेट **राजकारणात** उतरल्याचे चित्र कल्याण पूर्वेत पाहायला मिळत आहे.

कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 12 मधील एका इमारतीतील घराबाहेर ही पाटी लावण्यात आली आहे. या पाटीवर लिहिले आहे —

> “दारावरची बेल वाजवून त्रास देऊ नका.
> आमच्या घरातलेच नाही, तर अख्ख्या बिल्डिंगचे वोट फक्त ‘Sachin Pote’ यांनाच!”

इतक्यावरच न थांबता, पाटीवर शिवसेना ची निवडणूक निशाणी धनुष्यबाण ही ठळकपणे रेखाटण्यात आली आहे. त्यामुळे हा संदेश कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही, हे अगदी स्पष्ट होते.

या पाटीची खास गोष्ट म्हणजे — याच पॅनलमधून सचिन पोटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या एका राजकीय उमेदवाराच्या नजरेस ही पाटी पडली. मात्र, राजकीय वैर बाजूला ठेवत त्याने खिलाडूवृत्ती दाखवली. आणि या ‘पुणेरी टाईप’ पाटीचा फोटो काढून तो थेट सचिन पोटे यांनाच पाठवला. या प्रतिस्पर्ध्यानेही या कल्पकतेला दिलेली दाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, या पाटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. कुणी “हीच खरी पुणेरी स्टाईल” म्हणत कौतुक करत आहे, तर कुणी “डोअर टू डोअर प्रचाराला थेट ब्रेक” अशी मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

एकूणच काय, तर केडीएमसी निवडणुकीच्या रणधुमाळीत कल्याण पूर्वेतील ही पुणेरी टाईप पाटीकेवळ सूचना न राहता, राजकीय चर्चेचा आणि मनोरंजनाचाही विषय ठरली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा