
डोंबिवली दि.1 ऑगस्ट :
रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त डोंबिवलीतील वे टू कॉज फाऊंडेशन आणि रायडर्स क्लबमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही एक बंधन 2025, “वीरबन्धनम् (वीरांसोबतचे बंधन)” हा देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत डोंबिवलीचा सुप्रसिद्ध ‘चहावाला’ अशी ओळख असणारे समाजसेवक रोहित वसुदेव आचरेकर हे यंदा तब्बल 35 हजारांहून अधिक राख्या, 937 फुटांचा भव्य तिरंगा आणि 21 ध्वज सीमेवरील लष्कराच्या सैनिकांकडे सुपुर्द करणार आहेत. (Dombivli’s ‘Chahawala’ is again on a patriotic mission; Under the Veerbandhanam initiative, more than 35 thousand rakhis, grand tricolour will be handed over to the Indian Army)
रोहित आचरेकर हे रक्षाबंधनानिमित्त गेल्या 19 वर्षांपासून सीमारेषेवर जाऊन जवानांच्या मनगटावर राख्या बांधण्याचा सामाजिक उपक्रम राबवत आहते. ज्याला देशभरातील हजारो बहिणींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदा प्राप्त झालेल्या 35 हजारांहून अधिक राख्या घेऊन ते स्वतः सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचवणार आहेत.
तर यंदा या संस्थेकडे प्राप्त झालेल्या ३५ हजार राख्यांपैकी तब्बल १५ हजार राख्या या ‘मी डोंबिवलीकर’ सामाजिक संस्थेद्वारे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि इतर प्रमुख शहरांतून जमा झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या सर्व राख्या रोहित आचरेकर यांच्याकडे नुकत्याच सुपूर्द करण्यात आल्या. मागील दोन वर्षांपासून ‘डोंबिवलीकर’ संस्थेतर्फे रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा देण्यात येत आहे.
याशिवाय रोहित आचरेकर हे तब्बल ९३७.५ फूटाचा भव्य भारतीय तिरंगाही घेऊन जाणार असून हा तिरंगा द्रास, लडाख येथील कारगिल वॉर मेमोरियल येथे अभिमानाने हस्तांतरित करण्यात जाणार आहे. त्यासोबतच विजय पथासाठी २१ तिरंगे ध्वजही दिले जाणार असून ही जे शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून सीमा भागात लावले जातील असे आचरेकर यांनी सांगितले.
यासोबतच संस्थेतर्फे यंदा १५ लाख निधी संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा निधी भारतीय सैन्य कल्याण निधी (Indian Army Welfare Fund) मध्ये जमा होणार असून जखमी तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी वापरला जाणार आहे. आजपर्यंत या उपक्रमांतर्गत २ लाख रुपयांचा निधी संकलित झाल्याचेही त्यांनी सांगितले.
तर आमच्याकडे जमा होणारी “प्रत्येक राखी म्हणजे प्रेमाचा धागा, प्रत्येक तिरंगा म्हणजे सलाम असून
एक बंधन हा केवळ सण नाही तर भारतीयांनी आपल्या सैनिकांप्रती दिलेली भावनिक प्रतिज्ञा असल्याचे मत रोहित आचरेकर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात सहभाग आणि योगदानासाठी संपर्क :
संपर्क : 91 89763 87484
डिजिटल राख्या आणि निधी योगदानासाठी UPI:
9967859678@okbizaxis