Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमसाठी महत्त्वाची माहिती; केडीएमसीची मुख्य जलवाहिनी डॅमेज झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम...

कल्याण पश्चिमसाठी महत्त्वाची माहिती; केडीएमसीची मुख्य जलवाहिनी डॅमेज झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

 

खडकपाडा येथे सीसीटीव्हीची केबल टाकताना  मुख्य जलवाहिनी झाली डॅमेज

 

कल्याण दि.22 जून :
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कल येथे असणारी केडीएमसीची मुख्य जलवाहिनी डॅमेज झाल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याठिकाणी पोलीस विभागाकडून सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू असून त्याची भूमिगत केबल टाकताना ही मुख्य जलवाहिनी डॅमेज झाल्याची माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांकडून एलएनएनला देण्यात आली आहे. (Important information for Kalyan West; Damage to KDMC’s main water pipeline likely to affect water supply in the city)

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा सर्कल येथून ही केडीएमसीची 700 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे. मात्र भूमिगत केबलच्या खोदकामादरम्यान ती डॅमेज झाल्याने त्याठिकाणी पाण्याचा मोठा फवारा उडत आहे. तर या प्रकाराची माहिती मिळताच केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती काम सुरू केले आहे.

तर या दुरुस्ती कामासाठी कल्याण पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून यासाठी किती वेळ लागेल हे जलवाहिनीची नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती समजल्यावरच सांगता येईल अशी माहितीही पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा