Home ठळक बातम्या महत्त्वाची माहिती; गणेश विसर्जनाच्या या 4 दिवशी माणकोली पुलावर वाहतुकीला बंदी –...

महत्त्वाची माहिती; गणेश विसर्जनाच्या या 4 दिवशी माणकोली पुलावर वाहतुकीला बंदी – डीसीपी पंकज शिरसाट यांच्याकडून अधिसूचना जारी

 

डोंबिवली दि.21 ऑगस्ट :
कल्याण डोबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत रेतीबंदर मोठागाव माणकोली ब्रिजखालील रेतीबंदर खाडी येथे गणपती विसर्जन होत असते. त्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या काळामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी डोंबिवलीहून भिंवडीकडे जाण्यासाठी आणि भिवंडीहून डोंबिवलीत येण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. (Important information; Traffic banned on Mankoli bridge on these 4 days of Ganesh Visarjan – Notification issued by DCP Pankaj Shirsat)

याठिकाणी २८ ऑगस्ट २०२५ रोजी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन, २ सप्टेंबर २०२५ रोजी गणपती – गौरी विसर्जन आणि ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चर्तुदशीचे गणपती विसर्जन होणार आहेत. या चारही दिवशी माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ट्रॅफिक डीसीपी पंकज शिरसाट यांनी दिली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून गणेश विसर्जन होईपर्यंत ही अधिसूचना लागू राहणार आहे.

                 असे आहेत वाहतुकितील बदल..
प्रवेश बंद -१)
ठाणे, मुंबई येथुन माणकोली मोठागाव ब्रिजवरून मोठागाव डोबिवली पश्चिम येथे येणारी वाहतुक नारपोली वाहतूक उप विभाग हद्दीत १) मानकोली भिंवडी हायवे, २) अंजुर दिवेगाव, ३) लोढा धाम येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
ही वाहने नारपोली वाहतूक उप विभाग यांचे हद्दीत अंजुर फाटा, राजनोली भिवडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद -२)
कल्याण, अंबरनाथ, बदलापुर, नवीमुंबई येथुन मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांना कोळसेवाडी वाहतूक उप विभाग हद्दीत १) पत्रीपुल, २) टाटा नाका, ३) सुयोग हॉटेल, ४) डी एन एस बँकेजवळ, सोनारपाडा ५) मानपाडा पेट्रोलपंपाजवळ, मानपाडा चौक, ६) घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
ही वाहने कल्याण वाहतूक उप विभागाचे ह‌द्दीतुन दुर्गाडी चौक कल्याण मार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद ३)
ठाकुर्ली पुर्व – डोंबिवली पुर्वकडुन मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिंवडीकडे जाणाऱ्या वाहनांना कोपर ब्रिज आणि ठाकुर्ली ब्रिज येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
ही वाहने कल्याण वाहतूक उप विभागाचे हद्दीतुन दुर्गाडी चौक कल्याणमार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद -४)
डोंबिवली पश्चिमेकडुन मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिंवडीकडे जाणाऱ्या वाहनांना मोठागाव ब्रिज येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
ही वाहने कल्याण वाहतूक उपविभागाचे हद्दीतुन दुर्गाडी चौक कल्याणमार्गे इच्छित स्थळी जातील.

तर ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा