Home ठळक बातम्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध

 

कल्याण डोंबिवली दि.28 ऑगस्ट :
भाद्रपद महिन्यातील श्री गणेशोत्सव दि. 27 ऑगस्ट ते दि.06 सप्टेंबर 2025 या कालावधीत संपन्न होत असून यंदा श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करणे सोयीस्कर होण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून अभिनव संकल्पना राबवण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील प्रभाग निहाय नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची माहिती गुगल मॅप”सह (Location) https://mandap.singlewindowsystemkdmc.in/place/place या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Information about immersion sites in Kalyan-Dombivli Municipal Corporation area is now available on one click)p

या लिंकवर क्लिक केल्यावर ” *प्रभाग-पत्ता-विसर्जन स्थळाचे नाव- गुगल मॅप”* या स्वरुपात माहिती उपलब्ध होणार असल्याने, नागरीकांना आपले घर/मंडळा नजीकच्या विसर्जन स्थळी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करता येईल. त्याचप्रमाणे यामध्ये परिसरातील *वाहतुकीचे चित्र देखील स्पष्ट होणार असल्यामुळे नागरिकांना विसर्जन स्थळ सुनिश्चित* करणे सोयीचे होणार असल्याची माहिती केडीएमसी उपआयुक्त समीर भूमकर यांनी दिली आहे.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा