
(प्रातिनिधिक छायाचित्र)
वाढलेले मतदान कोणाच्या बाजूने ? उत्कंठा शिगेला
कल्याण डोंबिवली दि.16 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल झालेल्या 52 टक्के विक्रमी मतदानाने सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. वाढलेले हे मतदान सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात पडले की मतदारांनीही राजकारण्यांप्रमाणे काही वेगळी रणनीती आखली याचे चित्र आजच्या मतमोजणीतून लवकरच स्पष्ट होईल.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी आज (शुक्रवार दि.16 जानेवारी 2026 रोजी) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. या निवडणूकीची मतमोजणी एकुण 8 ठिकाणी (निवडणूक निर्णय अधिकारी 2 आणि 4 ची मतमोजणी एका ठिकाणी) होणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी 1 ते 9 यांच्या कडील मतमोजणी प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील.
अशी असेल मतमोजणीची प्रक्रिया…
1. निवडणूक निर्णय अधिकारी – 1 यांचेकडील मतमोजणी 17 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक 2 मध्ये 7 फेऱ्या, पॅनल क्रमांक 3 मध्ये 7 फेऱ्या व पॅनल क्रमांक 4 मध्ये 5 फेऱ्या होणार आहेत.
2. निवडणूक निर्णय अधिकारी – 2 यांचेकडील मतमोजणी 14 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक 1 मध्ये 6 फेऱ्या, पॅनल क्रमांक 5 मध्ये 3 फेऱ्या, पॅनल क्रमांक 6 मध्ये 4 फेऱ्या व पॅनल क्रमांक 10 मध्ये 3 फेऱ्या होणार आहेत.
3. निवडणूक निर्णय अधिकारी – 3 यांचेकडील मतमोजणी 14 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक 7 मध्ये 4 फेऱ्या, पॅनल क्रमांक 8 मध्ये 5 फेऱ्या व पॅनल क्रमांक 9 मध्ये 4 फेऱ्या होणार आहेत.
4. निवडणूक निर्णय अधिकारी – 4 यांचेकडील मतमोजणी 14 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक 11 मध्ये 4 फेऱ्या, पॅनल क्रमांक 12 मध्ये 5 फेऱ्या व पॅनल क्रमांक 18 मध्ये 4 फेऱ्या होणार आहेत.
5. निवडणूक निर्णय अधिकारी – 5 यांचेकडील मतमोजणी 16 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक 13 मध्ये 3 फेऱ्या, पॅनल क्रमांक 14 मध्ये 3 फेऱ्या, पॅनल क्रमांक 15 मध्ये 3 फेऱ्या व पॅनल क्रमांक 16 मध्ये 4 फेऱ्या होणार आहेत.
6. निवडणूक निर्णय अधिकारी – 6 यांचेकडील मतमोजणी 14 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक 20 मध्ये 4 फेऱ्या, पॅनल क्रमांक 26 मध्ये 5 फेऱ्या, पॅनल क्रमांक 27 मध्ये 4 फेऱ्या व पॅनल क्रमांक 28 मध्ये 4 फेऱ्याहोणार आहेत.
7. निवडणूक निर्णय अधिकारी – 7 यांचेकडील मतमोजणी 15 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक 21 मध्ये 3 फेऱ्या, पॅनल क्रमांक 22 मध्ये 4 फेऱ्या, पॅनल क्रमांक 23 मध्ये 3 फेऱ्या व पॅनल क्रमांक 25 मध्ये 5 फेऱ्याहोणार आहेत.
8. निवडणूक निर्णय अधिकारी – 8 यांचेकडील मतमोजणी 7 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी एकाचवेळी पॅनल क्रमांक 29 मध्ये 9 फेऱ्या व पॅनल क्रमांक 30 मध्ये 9 फेऱ्याहोणार आहेत.
9. निवडणूक निर्णय अधिकारी – 9 यांचेकडील मतमोजणी 16 टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी एकाचवेळी पॅनल क्रमांक 17 मध्ये 13 फेऱ्या, पॅनल क्रमांक 19 मध्ये 12 फेऱ्या व पॅनल क्रमांक 31 मध्ये 13 फेऱ्या होणार आहेत.






















