Home क्राइम वॉच हरवलेले मोबाईल खडकपाडा पोलिसांकडून नागरिकांना मिळाले परत ; सायबर फ्रॉड टाळण्याबाबतही मार्गदर्शन

हरवलेले मोबाईल खडकपाडा पोलिसांकडून नागरिकांना मिळाले परत ; सायबर फ्रॉड टाळण्याबाबतही मार्गदर्शन

कल्याण, दि. ९ ऑक्टोबर :
नागरिकांचे हरवलेले महागडे मोबाईल फोन खडकपाडा पोलिसांकडून संबंधितांना आज परत देण्यात आले. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या निर्देशानुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात एसीपी कल्याणजी घेटे यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन परत करण्यात आले. (Khadakpada police returns lost mobile phones to citizens; Guidance also provided on avoiding cyber fraud)

ज्यामध्ये एकूण २५ मोबाईल फोन, ज्यांची एकत्रित किंमत सुमारे ३ लाख ६५ हजार रुपये इतकी आहे. ते संबंधित नागरिकांना, त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. हरवलेला मोबाईल मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आनंद दिसून येत होता.

या मोबाईल हस्तांतरण कार्यक्रमासोबतच ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून आयोजित सायबर जनजागृती उपक्रमही यावेळी राबवण्यात आला. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना लक्षात घेता सायबर फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी, सुरक्षित इंटरनेट वापराचे नियम, संशयास्पद लिंक आणि कॉल टाळण्याचे मार्ग याबाबत नागरिकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच,जर कोणी सायबर फ्रॉडचा बळी ठरले, तर तात्काळ १९३० किंवा १९४५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या माध्यमातून तातडीने मदत मिळू शकते आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळता येते असे एसीपी कल्याणजी घेटे यांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळणे ही केवळ आर्थिक मदत नसून पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक बळकट करणारी बाब असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा