Home ठळक बातम्या डोंबिवलीतील मनसे नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; आम्ही विकासामध्ये कधी राजकारण केलं नाही...

डोंबिवलीतील मनसे नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; आम्ही विकासामध्ये कधी राजकारण केलं नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मनसे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांच्यासह समर्थकांचा पक्षप्रवेश

ठाणे दि.25 ऑगस्ट :
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला असून मनसेच्या राजन मराठे, ज्योती मराठे या माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पक्षप्रवेश झाले. त्यांच्यासोबतच ठाणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही आपल्या मुलासह अनेक समर्थकांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. (MNS corporators and office bearers from Dombivli join Shiv Sena; We have never done politics in development – Deputy Chief Minister Eknath Shinde)

जसजशी महापालिका निवडणूक जवळ येत चालली आहे तशा अनेक राजकीय घडामोडीही वेगाने घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील काँग्रेस माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच आता मनसेच्या मराठे दांपत्याने अनेक समर्थकांसह मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. तर गेल्याच्या गेल्या लोकसभा निवडणुकीत खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविलेल्या बाबाजी पाटील यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरातील राजकीय समीकरणाला वेगळे वळण देणारी महत्वाची घटना आज घडली. मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबाजी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील निवासस्थानी पार पडला.

आम्ही विकासामध्ये कधीही राजकारण केले नाही…
राज्यातील युती सरकारच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात अनेक विकासकामे केली जात आहेत. तसेच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातही समाजाभिमुख कामांसह विकासाचे प्रकल्प राबवले गेले. तर आजच्या घडीला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. आम्ही विकासकांमध्ये कधीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच लोकांना राजकारण नाही तर विकासकामे पाहिजे आहेत, त्यामुळेच तर इतक्या मोठ्या संख्येने अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा