Home बातम्या कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सनराईज गॅलेक्सीमध्ये नव्या सोसायटी कमिटीची स्थापना

कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सनराईज गॅलेक्सीमध्ये नव्या सोसायटी कमिटीची स्थापना

कल्याण दि.22 जून :

कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या सनराईज गॅलेक्सीमध्ये अखेर सोसायटी कमिटीची स्थापना करण्याला यश मिळाले आहे. याठिकाणी सोसायटीतील सर्वच सदस्यांच्या अथक प्रयत्न आणि एकत्रित सहयोगाने ही कमिटी स्थापन झाली आहे. तसेच या नव्या कमिटी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आगामी काळात एकता, समृद्धी आणि सहयोगातून सोसायटीच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य केले जाईल असा विश्वासही या नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांचे सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे. यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष मुनाफ मुंशी सय्यद, सचिव नदीम सत्तार सय्यद, खजिनदार होझेफा नासिकवाला हेदेखील उपस्थित होते.

अशी आहे नवी कार्यकारिणी…

चेतना नितीन भोईर- अध्यक्ष
रज्जा अब्दुल शेख-सचिव
नजीम अली सय्यद – खजिनदार

नयना श्याम आडके- सदस्य
नागनाथ लोलेवार- सदस्य
इस्माईल सतार शेख – सदस्य
ब्रिजेश जोशी – सदस्य
तृप्ती अजय गायकवाड – सदस्य
शेख इरफान युसफ – सदस्य
रईस अशरफ खान- सदस्य

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा