Home क्राइम वॉच कल्याणात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च

कल्याणात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च

 

कल्याण दि.1 सप्टेंबर :
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा – सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कल्याण परिमंडळ ३ पोलिसांनी कल्याण विभागात भव्य रूटमार्च आयोजित केला होता.

हा रूटमार्च महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील सहजानंद चौकातून सुरू झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, अत्रे रंगमंदिर, गांधी चौक, जुने बाजारपेठ पोलीस स्टेशन, कोकण मर्कंटाईल बँक, दुधनाका, विजय लॉन्ड्री, पारनाका, टिळक चौक, अहिल्याबाई चौक, मोहिंदर काबुलसिंग चौक, लाल चौकी, दुर्गा माता चौकमार्गे हा रूटमार्च गणेशघाट विसर्जन स्थळावर समाप्त झाला.

या रूटमार्चमध्ये पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ४, पीएसआय २१, पोलीस अंमलदार ११०, एसआरपीचा १ प्लॅटून, २ सेक्शन, तसेच पीटर मोबाईल ४, सीआरएम मोबाईल ४, पीसीआर मोबाईल ४ आणि स्ट्राइकिंग मोबाईल १ सहभागी झाले होते.

रूटमार्चाद्वारे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करून पोलिसांनी शांततेत आणि सुरक्षिततेत सण साजरा करण्याचे आवाहन केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा