Home ठळक बातम्या डोंबिवलीत मतदारांना पैसे वाटप ? शिवसेना उमेदवाराच्या आरोपाने खळबळ

डोंबिवलीत मतदारांना पैसे वाटप ? शिवसेना उमेदवाराच्या आरोपाने खळबळ

डोंबिवली दि.11 जानेवारी :
केडीएमसी निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून आता प्रचारही टोकाला पोहचला आहे. अशातच डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करताना आपण रंगेहात पकडल्याचे सांगत शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच एका घरात पैशांनी भरलेली पाकिटे आणि काही कार्यकर्ते असल्याचा एक व्हिडिओदेखील नितीन पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आणल्याने खळबळ उडाली आहे. (Shiv Sena Candidate Alleges Distribution of Cash to Voters in Dombivli)

डोंबिवलीच्या तुकाराम नगर येथील दशरथ भुवन परिसरातील घरांमध्ये हे पैसे वाटप सुरू होता असा दावा शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांनी केला आहे. याठिकाणी 3 हजार रुपयांची पाकिटे आढळून आली असून या प्रकरणाची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी तसेच पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनीही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे.

याबाबत निवडणूक अधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडून पुढील तपास केला जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा