Home ठळक बातम्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांची उद्या कल्याण पश्चिमेत...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांची उद्या कल्याण पश्चिमेत जाहीर सभा

पॅनल क्र. 6 मधील उमेदवार उमेश बोरगांवकर, संकेश भोईर, अपर्णा भोईर आणि स्वप्नाली केणे यांच्या प्रचारासाठी

कल्याण दि.8 जानेवारी :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांची उद्या शुक्रवारी सायंकाळी कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहत येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेच्या पॅनल क्र. 6 मधील पक्षाचे उमेदवार उमेश बोरगांवकर, संकेश भोईर, अपर्णा भोईर आणि स्वप्नाली केणे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती येथील उमेदवारांकडून देण्यात आली. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray faction) leader Bhaskar Jadhav will address a public meeting in Kalyan West tomorrow)

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर पातळीवरील जाहीर सभाही होणे असल्याची माहितीही उमेश बोरगांवकर यांनी यावेळी दिली.

तर पॅनल क्रमांक 6 मध्ये आम्ही अतिशय चांगली प्रचार यंत्रणा राबवत असून चौघाही उमेदवारांना पॅनलमधील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आम्ही प्रचारासाठी सर्व जण एकत्रितपणे जात असून इतरांसारखे वेगवेगळे मतदारांना भेटत नसल्याची टिका माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे. तसेच इतरांकडून एक मत याला द्या आणि एक मत त्याला द्या असा आमचा प्रचार सुरू नाहीये. आमच्या पॅनलच्या उमेदवारांनाच तुमची चारही मतं द्या अशी आम्ही मतदारांना विनंती करत असल्याचेही बोरगांवकर यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा