Home ठळक बातम्या राज्य गूप्त वार्ता कल्याण विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस...

राज्य गूप्त वार्ता कल्याण विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

 

कल्याण दि.31 जुलै :
पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमूळे राज्य गूप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात संभाजी देशमुख यांना हे मेडल प्रदान करण्यात आले. (State Secret Service Kalyan Department Police Officer Sambhaji Deshmukh awarded with President’s Police Medal for the second time.)

याअगोदर संभाजी देशमूख यांना यापूर्वी 2016 मध्येही जाहीर झालेले राष्ट्रपतींचे मैडल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सन 2018 ला देण्यात आले असून 28 जूलै रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस महासंचालक रश्मी शूक्ला यांच्या हस्ते देऊन कुटुंबासह सन्मानित करण्यात आले आहे.

सध्या राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेल्या संभाजी नारायण देशमूख यांनी पोलीस दलामध्ये ठाणे शहर आयूक्तालय, अँन्टीकरप्शन विभाग, राज्य गूप्तवार्ता विभाग मुंबई – कल्याण या प्रमुख ठिकाणी रश्मी शूक्ला, आशूतोष डूंबरे, श्रीकांत सावरकर, फत्तेसिह पाटील, छेरींग दोरजे, किशोर जाधव, दिपक साकोरे, संदिप जाधव, पराग मणेरे आदी वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनामध्ये उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी देशमूख हे गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण शहरात वास्तव्यास आहेत. त्यांचे एक बंधू रमेश देशमुख हे शहरातील प्रथितयश उद्योजक असून दुसरे बंधू सुदाम देशमुख हे माजी सैनिक – विद्यूत मंडळामध्ये ऑडीटर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच संभाजी देशमूख यांची मूले ही अमेरिकेत अभियांत्रीकीचे ऊच्चशिक्षण ,पीएचडी करून मोठ्या कंपनीत मॅनेजरपदी कार्यरत आहेत.

तर दुसऱ्यांदा मिळालेल्या या मानाच्या राष्ट्रपती पोलीस मेडलबद्दल संभाजी देशमूख यांच्यावर पोलीस अधिकारी, शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती नामांकित शैक्षणिक संस्था आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा