Home ठळक बातम्या दिवस – रात्री काम करून रस्त्यावरचे खड्डे भरा, अन्यथा कोणाचीही खैर नाही...

दिवस – रात्री काम करून रस्त्यावरचे खड्डे भरा, अन्यथा कोणाचीही खैर नाही – केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांचा सक्त इशारा

 

कल्याण डोंबिवली दि.23 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम दिवस – रात्र सुरू ठेवा अन्यथा कोणाचीही खैर केली जाणार नाही अशा शब्दांमध्ये केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांची खरडपट्टी काढली. रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी काल सर्व प्रभागातील अभियंते आणि ठेकेदार यांची बैठक घेतली. ज्यामध्ये कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरणीच्या कामाचा प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला. (Work day and night to fill potholes on the roads, otherwise no one will be harmed – KDMC Commissioner Abhinav Goyal’s stern warning).

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील 5 दिवसात जास्तीत जास्त मशिनरी आणि मनुष्यबळ वापरून रस्ते दुरुस्ती करावी, दिवस आणि रात्री अशा दोन्ही सत्रात काम करावे. तसेच जास्त वाहतुकीचे, वर्दळीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काम करण्याचे निर्देश त्यांनी सर्व प्रभागातील अभियंते आणि ठेकेदार यांना दिले.
तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी आपत्ती घडल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करण्याचा इशाराही त्यांनी या बैठकीमध्ये दिला.

या बैठकीला शहर अभियंता अनिता परदेशी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा