Home ठळक बातम्या डोंबिवली पश्चिमेत ४५ वर्ष जुनी 4 मजली इमारत खचली; रहिवाशांच्या सतर्कतेमुळे...

डोंबिवली पश्चिमेत ४५ वर्ष जुनी 4 मजली इमारत खचली; रहिवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

 

डोंबिवली दि.16 ऑगस्ट :
एकीकडे सर्वत्र स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह असताना डोंबिवली पश्चिमेच्या गुप्ते रोडवर असणारी 45 वर्षे जुनी चारमजली इमारत खचल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. सीमंतिनी सोसायटी असे या इमारतीचे नाव असून रहिवाशांनी वेळीच सतर्कता दाखवत इमारत रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

डोंबिवली पश्चिमेच्या गुप्ते रोडवरील शिवमंदिर परिसरात ही इमारत आहे. साधारणपणे ही 45 वर्षे जुनी इमारत असून काल सायंकाळी या इमारतीच्या तळ मजल्याला तडे गेले. इथल्या रहिवाशांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास स्थानिक पोलीस आणि केडीएमसीच्या आपत्कालीन विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार केडीएमसीच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी त्या सर्व रहिवाशांची समजूत काढत त्यांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान ही इमारत धोकादायक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची , माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा