Home ठळक बातम्या Operation Sindoor : “आता बाबांना शांती मिळेल मात्र अतिरेक्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करून...

Operation Sindoor : “आता बाबांना शांती मिळेल मात्र अतिरेक्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाका “

पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षलने व्यक्त केली भावना

डोंबिवली दि.7 मे :
भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या प्रमुख ठिकाणांवर एअर स्ट्राईक करत पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर (operation Sindoor) अंतर्गत करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकनंतर आता बाबांना शांती मिळाली असेल मात्र या अतिरेक्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात यावे अशी भावना हर्षल लेले याने व्यक्त केली आहे. पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा हर्षल हा मुलगा असून त्याच्यासह कुटुंबियांच्या डोळ्यादेखत अतिरेक्यांनी त्याच्या वडीलांची हत्या केली होती. (Operation Sindoor: “Now Baba will get peace but completely eliminate the terrorists”)

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मोठी मागणी देशभरातून होत असताना भारताने पाकिस्तानातील 9 अतिरेकी ठिकाणांवरती एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले. आता भारताने केलेल्या हल्ल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत ही खरी श्रध्दांजली असल्याचं म्हटलं आहे. पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झालेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षलने केवळ एक ऑपरेशन करून न थांबता हा दहशतवाद मुळासकट उखडून टाकावा’ अशी भावना व्यक्त केली आहे. आर्मी, एअर फोर्स, नेव्ही या तिन्ही बाजूने असे ऑपरेशन्स चालू ठेवावेत, या आधीही दोन वेळा आपण हल्ला केला होता, तरीही त्यांनी अतिरेकी हल्ला करण्याची हिंमत केली, आता त्यांना अशी अद्दल घडली पाहिजे की त्यांनी परत कधी अटॅक केला नाही पाहिजे, पुन्हा हल्ला करायला ते उरलेच नाही पाहिजे, असेही हर्षलने सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा