Home ठळक बातम्या सेल्फ डिफेन्स अत्यंत महत्त्वाचा विषय,अधिकाधिक तरुणांनी सैन्यात दाखल व्हावे – राष्ट्रवादीचे प्रदेश...

सेल्फ डिफेन्स अत्यंत महत्त्वाचा विषय,अधिकाधिक तरुणांनी सैन्यात दाखल व्हावे – राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव

कल्याण दि.7 मे :
सेल्फ डिफेन्स म्हणजेच स्व संरक्षण हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक असून देशातील अधिकाधिक तरुणांनी सैन्यदलामध्ये भरती होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि नागरी संरक्षण दलातर्फे कल्याणात उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Self-defense is a very important subject, more and more youth should join the army – NCP regional vice-president Pramod Hindurao)

भारत पाकिस्तानमधील संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय स्तरावर संरक्षण मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना जागृत करण्याबद्दल, महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे या संरक्षण मॉक ड्रिलचे भाग असतील आणि विशेष म्हणजे एक जागरूक नागरिक म्हणून या मॉक ड्रिलमध्ये आपण काय करावे या मुद्द्यांवर प्रमोद हिंदुराव यांनी या पत्रकार परिषदेत प्रकाश टाकला. तसेच याप्रसंगी स्वतःचे संरक्षण करणे किंवा ‘सेल्फ डिफेन्स’ या विषयाचे महत्त्वही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या इजरायल स्टडी टूरच्या अनुभवातून त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

पहलगाम हल्ला आणि त्यानंतर केंद्र सरकारने घोषित केलेल्या मॉक ड्रील च्या पार्श्वभूमीवर तरुणांना सैन्यात दाखल होण्याचे तसेच युद्धजन्य परिस्थितीशी दोन हात करण्याबाबत प्रशिक्षण देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न होण्याचे आवाहनही हिंदुराव यांनी यावेळी केले. याचवेळी राज्याचे अर्थमंत्री आणि उप्मुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या रूपाने राज्यातील सत्ताधारी पक्षात आपण असल्याने कल्याण नजीकच्या मुरबाड शहापूर परिसरातील पाणी टंचाई दूर करत घरोघरी नळ योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर शहापूर मुरबाड भिवंडी या परिसरातून पाणी मुंबईला जाते. मात्र गेल्या पन्नास वर्षांपासून आमच्यावर अन्याय होत आहे. केंद्रात आणि राज्यात आता सत्ता आमची आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण तालुक्यातील महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा आम्हाला उतरवायचा आहे घरोघरी नळ योजनाच्या माध्यमातून आम्ही महिलांना नक्की दिलासा देऊ असा विश्वासही प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा