Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील या भागांमध्ये मंगळवारी (27 मे 2025) 8 तास पाणी पुरवठा...

कल्याण डोंबिवलीतील या भागांमध्ये मंगळवारी (27 मे 2025) 8 तास पाणी पुरवठा राहणार बंद

कल्याण दि.22 मे :
महावितरणकडून २२ KV NRC-२ फिडर सब स्टेशनच्या देखभाल दुरूस्तीचे काम तसेच पावसाळ्यापूर्वी केडीएमसीच्या सर्वच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकरणांचीही दुरुस्ती केली जाणार असल्याने कल्याण डोंबिवलीतील या भागांचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी 27 मे 2025 रोजी 8 तास बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. (Water supply will be cut off for 8 hours in these areas of Kalyan Dombivali on Tuesday 27 May 2025)

महावितरणच्या या सबस्टेशनवरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतीवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा केला जातो. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा वीज पुरवठा बंद राहणार असल्याने नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी केडीएमसीच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

त्यामुळे मंगळवारी 27 मे 2025 रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८ तास कल्याण डोंबिवलीतील पुढील भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या भागांमध्ये नसेल पाणी…
महापालिकेच्या क्षेत्रातील कल्याण ग्रामिण विभाग मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पूर्व – पश्चिम विभाग आणि डोंबिवली पूर्व तसेच डोंबिवली पश्चिम परिसराचा पाणीपुरवठा 27 मे 2025 रोजीच्या मंगळवारी बंद राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले आहे.

तरी या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा