
(ही दृश्य आपल्याला विचलित करू शकतात)
कल्याण दि.26 मे :
ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्यात जुलै महिन्याप्रमाणे विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसाने सगळ्यांनाच गोंधळात टाकले आहे. अशात कल्याण तालुक्यातील फळेगाव येथे वीज पडून चार वासरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
फळेगाव येथील गुरुनाथ काशिनाथ बांगर यांच्या बेड्यावर पहाटे साडेचार च्या सुमारास ही वीज पडली आणि या मुक्या प्राण्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले. या संदर्भात कल्याण तहसील कार्यालयाने पंचनामा केला असून अहवालासह पंचनामा देण्याची तजवीज केली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली