Home ठळक बातम्या कल्याणातील 200 वर्षे जुन्या विठ्ठल राही-रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी

कल्याणातील 200 वर्षे जुन्या विठ्ठल राही-रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी

महाराष्ट्रातील मोजक्या मंदिरांपैकी एक मंदिर कल्याणात

कल्याण दि.6 जुलै :
“राही रखुमाबाई राणीया सकळा…ओवाळितो राजा विठोबा सावळा” या सुमधुर आरतीमध्ये वर्णन असलेले विठुराय, राही आणि रखुमाबाईच्या 200 वर्षे जुन्या मंदिरात भक्तांनी आज मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिमेतील कासारहाट परिसरात हे प्राचीन मंदिर असून त्वष्टा कासार समाजातर्फे पिढ्या न पिढ्या याठिकाणी महापूजा केली जात आहे. (A large crowd of devotees gathers for darshan at the 200-year-old Vitthal Rahi-Rakhumai temple in Kalyan)

कल्याण शहराला पूर्वीपासूनच प्राचीन परंपरेचा आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. याठिकाणी आजही अनेक मंदिरे, वास्तू त्याची साक्ष देत असून कासारहाट येथील विठ्ठल राही-रखुमाई मंदिरही त्यापैकी एक. त्यातही विठुरायाच्या राही (राधा) आणि रखुमाबाईच्या या दोन्ही पत्नी एकत्रित आणि एकाच मंदिरात ही तशी अत्यंत दुर्मिळ बाब आहे. महाराष्ट्रात किंबहुना देशामध्ये फार कमी ठिकाणी या तिघांचे एकत्रित मंदिर सहसा पाहायला मिळत नाही.

मात्र गेल्या दोनशे वर्षांपासून कल्याणातील या मंदिरात विठ्ठल राही-रखुमाईची अतिशय भक्तिभावाने पूजा केली जात आहे. तसेच सुरुवातीपासूनच या मंदिराचे व्यवस्थापन त्वष्टा कासार समाजाकडे आहे. देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. आजही याठिकाणी तशीच गर्दी पाहायला मिळाली. तर या मंदिरात असणारी विठ्ठल राही आणि रखुमाबाईची पुरातन मूर्ती ही पंचधातुंपासून बनवण्यात आली असून तिचे तेज हे किंचितही कमी झालेले नाही अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष केतन हजारे यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा