Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेच्या ड प्रभागक्षेत्रात अनधिकृत बॅनर – होर्डिंग्ज विरोधात धडक कारवाई; इतर...

कल्याण पूर्वेच्या ड प्रभागक्षेत्रात अनधिकृत बॅनर – होर्डिंग्ज विरोधात धडक कारवाई; इतर भागात केव्हा होणार ?

 

कल्याण दि.7 जुलै :
कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून अनधिकृत होर्डिंग हटविण्याबाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निर्देश दिले आहेत. त्यानूसार “५/ड” प्रभागातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर सहाय्यक आयुक्त उमेश यमगर आणि त्यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. (Crackdown against unauthorized banners and hoardings in D ward area of ​​Kalyan East; When will it happen in other areas?)

या कारवाईमध्ये रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील एकूण 27 बॅनर्स,पोस्टर्स हटविण्यात आले. इतकेच नाही तर संतोष नगर नाला शौचालयाजवळ – 10×15 चे दोन होर्डिंग, संतोषनगर कमानीजवळ –15×15 चे एक होर्डिंग, तिसगाव नाका येथील 20×20 चे एक होर्डिंग, ड’ प्रभाग क्षेत्र– 10×10ची दोन होर्डिंग, कल्याण शीळ रोडवरील 20×40 चे एक होर्डिंग, आमराई चौक ते विजयनगर रस्ता – 20×20 चे एक होर्डिंग अशा एकूण आठ होर्डिंग्जवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी दिली. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तसेच सर्व जाहिरात एजन्सी, दुकानदार, व्यापाऱ्यांनी अनधिकृत किंवा कालबाह्य परवानगीचे होर्डिंग्ज तात्काळ स्वतःहून काढून टाकावेत. आणि कालबाह्य परवान्यांचे नूतनीकरण तातडीने करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतर प्रभागात अशा प्रकारची कारवाई कधी होणार की एखादी दुर्घटना घडल्यावरच तिथल्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना जाग येणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा