Home ठळक बातम्या आगामी महापालिका निवडणुक; कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार

आगामी महापालिका निवडणुक; कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार

एआयसीसी सचिव यू.बी. व्यंकटेश यांच्या उपस्थितीत कल्याणात झाली बैठक

कल्याण दि.9 जुलै :
राज्यात सर्वत्र सध्या महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार आज झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग प्रभारी यू. बी. व्यंकटेश यांच्या उपस्थितीत कल्याणच्या पाम रिसॉर्ट येथे ही बैठक संपन्न झाली. (Upcoming Municipal Elections; Determined to further strengthen Congress organization in Kalyan-Dombivli)

या बैठकीदरम्यान आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्षाच्या भविष्यातील धोरणांबाबत सविस्तर चर्चाही करण्यात आली.

या बैठकीचे आयोजन कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रय पोटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यामध्ये कोकण प्रभारी व्यंकटेश यांच्यासह कल्याण-डोंबिवली प्रभारी राजन भोसले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त या वरिष्ठ नेत्यांनीही उपस्थितांना महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यास सांगून महत्वाच्या सूचना केल्या.

यावेळी कल्याण डोंबिवली सहप्रभारी श्रीकृष्ण सांगळे, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदीप चौबे, गुरू गोविंदसिंग बच्चर,कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसचे कांचन कुलकर्णी, राजाभाऊ पातकर, मुन्ना तिवारी, सुरेंद्र आढाव, विमल ठक्कर, शकील खान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा