Home ठळक बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणात भव्य आरोग्य शिबीर; शेकडो नागरिकांनी घेतला...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणात भव्य आरोग्य शिबीर; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणातही भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

कल्याण दि.20 जुलै :
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे येत्या 22 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, कल्याण शहर भाजप आणि माजी अध्यक्ष वरुण पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्य सेवा शिबिरात ते बोलत होते. (A grand health camp was held in Kalyan on the occasion of Chief Minister Devendra Fadnavis’ birthday; Hundreds of citizens took advantage)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 22 जुलैला भाजपतर्फे प्रत्येक मंडलात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या काळामध्ये रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान करून सामाजिक भान जपण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

अशा उपक्रमांतून जनतेच्या मनातील पक्षावरचा विश्वास दृढ करण्याचे काम…माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील
तर समाजसेवेचे व्रत घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत असते.जनताभिमुख काम करणे हे भारतीय जनता पार्टीचे ब्रीदवाक्य आहे. आरोग्य क्षेत्रातील अडचणी किंवा सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांना मोफत औषध उपचार मिळण्याच्या उद्देशाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. तसेच “पक्ष माझा स्वाभिमान, पक्ष माझा अभिमान, पक्ष माझा श्वास आणि पक्ष माझा विश्वास “या ध्येयाने कार्यकर्ते काम करत असून जनतेच्या मनातील पक्षावरचा विश्वास अधिक दृढ करण्याचे काम अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून होत असते,जनतेशी जोडण्याचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून केले जाते असे गौरवोद्गारही कपिल पाटील यांनी यावेळी काढले.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कल्याण शहर आणि माजी अध्यक्ष वरुण पाटील यांच्या माध्यमातून वायले हॉलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. तर या आरोग्य शिबिराचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे कल्याणातील कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते 50 हजार रुपयांची आर्थिक मदतही यावेळी देण्यात आली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, माजी शहरप्रमुख वरुण पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सचिव प्रिया शर्मा, मध्य कल्याण मंडल अध्यक्ष रितेश फडके, अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, दया गायकवाड, प्रेमनाथ म्हात्रे , महेश जोशी, डॉ. चंद्रशेखर तांबडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा