Home क्राइम वॉच रिसेपशनिस्ट तरुणीला मारहाण; मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला दिले मानपाडा पोलिसांच्या ताब्यात

रिसेपशनिस्ट तरुणीला मारहाण; मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला दिले मानपाडा पोलिसांच्या ताब्यात

कल्याण दि.23 जुलै :
कल्याण पूर्वेच्या नांदिवली परिसरात खासगी रुग्णालयाच्या रिसेपशनिस्टला अमानुष मारहाण करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. कल्याण पूर्वेतील मनसे कार्यकर्त्यांना या आरोपीला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या रिसेप्शनिस्टला झालेल्या मारहाणीच्या या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावरून अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.

कल्याण पूर्वेच्या नांदिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये ही मारहाणीची घटना घडली होती. डॉक्टरांना भेटण्यासाठी थांबण्यास सांगितल्याने गोकुळ झा नामक व्यक्तीकडून रिसेप्शनिस्ट तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच स्तरांतून या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनेही या मारहाणीचा निषेध तीव्र शब्दांत निषेध करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. तर मनसेने याप्रकरणी आणखी उग्र भूमिका घेत आरोपी अटक झाला नाही तर थेट पोलिस ठाण्याबाहेर आंदोलनाच पवित्रा घेतला होता.

दरम्यान मारहाणीच्या या घटनेनंतर आरोपी गोपाल झा हा फरार झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनीही त्याला पकडण्यासाठी इशारा दिला होता. त्याचवेळी नेवाळी नाका परिसरातून हा व्यक्ती जात असल्याचे मनसैनिकांना दिसून आल्याचे सांगत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

या क्षुल्लक कारणावरून केली अमानुष मारहाण…
मी त्याला एवढंच बोलले की, तुमचा सध्या नंबर नाहीये, तुम्ही १० मिनिटे वाट बघा. तर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ केल्यानंतर मी ही व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने बोलत नाही आहे, असे आमच्या सरांना सांगितले.. मी त्याला असेही सांगितले की तू माझ्याशी नीट बोल. तर तो माणूस माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि त्यानंतर माझे केस पकडून दरवाजापर्यंत मला खेचत खेचत नेले. मला त्यांनी एवढे मारलं की माझा श्वासही थोड्या क्षणांसाठी थांबला होता, असे या पीडित तरुणीने सांगितले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गोकुल झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा