Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्याही (बुधवार 20 ऑगस्ट 2025) सुट्टी जाहीर

ठाणे जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्याही (बुधवार 20 ऑगस्ट 2025) सुट्टी जाहीर

 

ठाणे दि. 19 ऑगस्ट :
अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्याही बुधवार 20 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शाळांना सोमवारी आणि मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यासोबतच आता उद्या 20 ऑगस्ट रोजी ही जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या शाळांना पुन्हा एकदा प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा