Home ठळक बातम्या बिनखड्ड्याचा रस्ता दाखवा आणि 5 हजारांचे बक्षीस मिळवा – काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष...

बिनखड्ड्याचा रस्ता दाखवा आणि 5 हजारांचे बक्षीस मिळवा – काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांचे केडीएमसीला आवाहन

 

कल्याण दि.20 ऑगस्ट :
गणेशोत्सव तोंडावर येऊनही अद्याप कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी अनोखी स्पर्धा जाहीर करत बिना खड्ड्यांचा रस्ता दाखवणाऱ्याला 5 हजारांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच केडीएमसीच्या कारभारावरही टिका केली आहे. (Show a pothole-free road and get a reward of Rs 5,000 – Congress Women District President Kanchan Kulkarni’s appeal to KDMC)

गणेशोत्सव तोंडावर येऊनही अद्याप कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे परिस्थितीत आहेत. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव हा लोकांच्या भावनांशी जडलेला सण सुरू होत आहे. या परिस्थितीत खड्ड्यांमधून श्री गणरायाचे आगमन झाले तर श्री गणेशमूर्तीची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर असे झाले तर गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या जातील अशी भावना जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

तसेच येत्या ३/४ दिवसात संपूर्ण कल्याण शहरातील छोटे-मोठे आणि मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणीही कुलकर्णी यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. तसे न झाल्यास कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या वतीने “ ५०० मीटरचा विना खड्ड्याचा रस्ता दाखवा आणि रोख ५०००/- रुपयांचे बक्षीस मिळवा “ अशा प्रकारची स्पर्धा पालिकेच्या आवारात घेण्यात येईल आणि याचे जे ही परिणाम होतील त्याकरिता तुम्ही स्वतः जबाबदार असाल असेही त्यांनी म्हटले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा