Home ठळक बातम्या भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा...

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झाला प्रवेश सोहळा

डोंबिवली दि.12 नोव्हेंबर :
आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय घडामोडी दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याला काहीही दिवस उलटत नाहीत तोच या पक्षाच्या शहरप्रमुखासह मनसे पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि दिपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. (Political Switch Continues: Shiv Sena (UBT) and MNS Leaders from Dombivli Join BJP)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते, कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब आणि माजी स्थायी समिती सभापती दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत, डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी ओमनाथ नाटेकर (शहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, डोंबिवली पूर्व), सचिन कुर्लेकर (शाखा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), हरिश्चंद्र परडकर (शहर संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), मिलिंद म्हात्रे (अध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना, डोंबिवली शहर), गणेश यादव (विभाग प्रमुख, मनसे), समीर पाटील (शाखा अध्यक्ष, मनसे) यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, मंदार टावरे, नगरसेवक मंदार हळबे तसेच डोंबिवली शहरातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशामुळे डोंबिवली शहरात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा