Home ठळक बातम्या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण...

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात ५ तासांची मॅरेथॉन बैठक

ठाणे दि.24 डिसेंबर :
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात काल रात्री तब्बल पाच तासांची मॅरेथॉन चर्चा झाली. या बैठकीला शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळेही उपस्थित होते. (Mahayuti’s seat-sharing formula finalised; five-hour marathon meeting between Deputy Chief Minister Eknath Shinde and BJP Maharashtra President Ravindra Chavan)

ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पार पडली असूनजागावाटपाची चर्चा पहाटेपर्यंत सुरू होती. या बैठकीत ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) महापालिकांमधील शिवसेना–भाजप युतीच्या जागावाटपावर सखोल चर्चा करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, युतीतील समन्वय आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभावशाली वॉर्डमधील उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकीय चर्चा असतानाच बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अनेक विषयांवर हास्यविनोद करत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वगुणांवर आणि कार्यक्षमतेवरही चर्चा झाली. बैठकीस उपस्थित प्रत्येक नेत्याने मोदीजींसोबत काम करतानाचे वैयक्तिक अनुभवही शेअर केले, अशी माहिती समोर आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा