
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दिली माहिती
कल्याण डोंबिवली दि.29 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्यातील समझोत्यानुसार काँग्रेसला 55 आणि राष्ट्रवादीला 45 तर वंचित बहुजन आघाडीसाठी 12- 15 जागा सोडण्याचे ठरल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दिली आहे. (The alliance between the Congress and the Sharad Pawar–led NCP has been finalized for the KDMC elections)
कल्याण डोंबिवली महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या जागावाटपाबाबत काल चर्चा झाली. ज्यामध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीत संपुर्ण ताकदीने उतरणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीसोबतही बोलणी अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबत निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली.
या आघाडीमुळे बहुजन समाज आणि मुस्लिम समाजाची मते एकत्र होऊन अनेक प्रभागातील समीकरणे बदलतील असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजाभाऊ पातकर यांनी व्यक्त केला.
या आघाडीच्या बैठकीला काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर, प्रदेश सचिव ब्रीजकिशोर दत्त,प्रदेश सचिव अँड नवीन सिंग,मुन्ना तिवारी,निवडणूक प्रचार प्रमुख रत्नप्रभा म्हात्रे तसेच राष्ट्रवादीकडून खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, प्रदेश प्रवक्ता महेश तपासे, जिल्हाध्यक्ष वंडारशेठ पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

























