
कल्याण डोंबिवली दि.30 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अधिकारी/कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे निवडणूक कर्तव्यावर अद्यापही हजर न झालेले, प्रामुख्याने “VST”, “FST” व “SST” या पथकातील अधिकारी/कर्मचारी आणि “झोनल अधिकारी” म्हणून नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सहा.आयुक्त संदीप रोकडे यांस दिले आहेत. या आदेशानुसार एकूण 28 अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना देखील नोटिसा बजावण्यात आले असून त्यांना कर्तव्यावर हजर होण्याची एक संधी देण्यात आली आहे. हे कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर न झाल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशाराही केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिला आहे.

























