
कल्याण डोंबिवली दि.22 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाअंतर्गत येणाऱ्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांवर विद्युत – यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या आवश्यक कामांमुळे येत्या मंगळवारी 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत (8 तास) संबंधित भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. (Important Update: Kalyan-Dombivli Water Supply to Remain Shut for 8 Hours on This Day)
या कालावधीत कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) आणि डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा होणार नाही.
तरी, या परिसरातील नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसी पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

























