Home Uncategorised शैक्षणिक तेजाचा झळाळता दीपस्तंभ ; डोंबिवलीच्या अरुणोदय प्राथमिक शाळेची राज्यस्तरावर रजतमुद्रा

शैक्षणिक तेजाचा झळाळता दीपस्तंभ ; डोंबिवलीच्या अरुणोदय प्राथमिक शाळेची राज्यस्तरावर रजतमुद्रा

डोंबिवली दि.13 एप्रिल :
डोंबिवली येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अद्वितीय प्रतिभेचा ठसा उमटवत राज्यस्तरावर शाळेच्या यशाचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे.
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता तिसरीतील कुमार कौस्तुभ सत्यवान गावकर याने राज्यात ७४ वा क्रमांक प्राप्त करत उज्ज्वल यश संपादन केले आहे. तसेच इयत्ता सहावीतील कुमार अजिंक्य अविन मंडलिक याने महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत याने राज्यात १५८ वा क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली आहे. (A Shining Beacon of Educational Excellence; Dombivli’s Arunodaya Primary School Earns Silver Honour at State Level)

✨ विज्ञानाच्या क्षितिजावर सुवर्णाक्षरांनी कोरलेले यश! ✨
प्रतिष्ठेच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत इयत्ता सहावीतील कुमार भूषण समीर सक्रे याने आपल्या विलक्षण वैज्ञानिक प्रतिभेचा परिचय देत सिल्वर मेडल व सन्मानपत्र पटकावले आहे. ही कामगिरी म्हणजे शालेय जीवनातील विज्ञानप्रेम, जिज्ञासा आणि संशोधन वृत्तीचा तेजस्वी विजयकळस ठरली आहे. या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला आहे.

या सर्व यशामागे शाळेतील समर्पित शिक्षकवर्ग आणि प्रेरणादायी नेतृत्व करणारे मुख्याध्यापक श्री. सुरेश नारोळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास व जिद्द निर्माण झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने शाळेचे नाव महाराष्ट्राच्या शैक्षणिक नभांगणात तेजस्वी नक्षत्राप्रमाणे उजळवले असून, संस्था व पालकवर्गाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा