
कल्याण दि.26 मे :
ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही कोवीडमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोवीडचे एकूण चार रुग्ण आढळले असून दोन व्यक्तींवर खासगी रुग्णालयात तर एकावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तर एक रुग्ण बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्याची माहिती केडीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे. (A woman died due to Covid in Kalyan; KDMC administration informed that two more patients are undergoing treatment in a government hospital) LNN – LocalNewsNetowrk
तसेच नागरिकांनी घाबरून न जाता कोवीड काळात घेण्यात आलेल्या सर्व खबरदारी घेण्याचे आवाहनही केडीएमसी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
LNN – LocalNewsNetowrk