Home ठळक बातम्या इच्छुकांची धाकधुक वाढली; कल्याण डोंबिवलीसह 29 महानगरपालिकांमधील महापौरपद आरक्षणाची सोडत 22...

इच्छुकांची धाकधुक वाढली; कल्याण डोंबिवलीसह 29 महानगरपालिकांमधील महापौरपद आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला

मुंबई दि.19 जानेवारी :
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. याबाबतची बैठक येत्या गुरुवारी 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात (6 वा मजला) आयोजित करण्यात आली आहे. (Anxiety Rises Among Aspirants; Mayor Reservation Draw for 29 Municipal Corporations Including Kalyan-Dombivli on January 22)

ही सोडत नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी यासंदर्भात अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये महापौर पदाचे आरक्षण निश्चित होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची पुढची दिशा यातून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसणार असल्याचे सुतोवाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत असून शिवसेना आणि भाजपमधील दिग्गजांनी त्यासाठी लॉबिंगही सुरू केली आहे. मात्र आता येत्या गुरुवारी जाहीर होणाऱ्या सोडतीमध्ये कल्याण डोंबिवलीसाठी काय आरक्षण पडते याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा