Home ठळक बातम्या भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट;...

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट; आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा

नवी दिल्ली, दि.11 डिसेंबर —
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत येणाऱ्या निवडणुकांसंदर्भातील संघटनात्मक चर्चा झाल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली. (BJP State President Ravindra Chavan Meets Union Home Minister Amit Shah; Holds Organisational Discussions Ahead of Upcoming Local Elections)

गेल्या काही महिन्यांत कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पक्षफोडीच्या आरोपांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील काही दिवसांपूर्वी दिल्लीला भेट देत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली होती.

दरम्यान, डोंबिवलीत झालेल्या महत्त्वाच्या विकासकामांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण एकाच मंचावर दिसले होते. यामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत मतभेद शमत असल्याचा संकेत देण्यात आला होता.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांच्या दिल्लीतील भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून आगामी निवडणुकांसाठी भाजप संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा