Home ठळक बातम्या इमारत नोटीस प्रकरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर केडीएमसी प्रशासनासोबत झाली रहिवाशांची...

इमारत नोटीस प्रकरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर केडीएमसी प्रशासनासोबत झाली रहिवाशांची बैठक

डोंबिवली दि.23 फेब्रुवारी :
डोंबिवलीच्या आयरे गावातील इमारतीला केडीएमसीने बजावलेल्या कारवाईच्या नोटीसीमुळे इथले रहिवासी हवालदिल झाले आहेत. त्याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांना फोन करत तातडीने या रहिवाशांची भेट घेण्याची सूचना केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी सकाळी आमदार राजेश मोरे आणि केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत या रहिवाशांची एक बैठकही घेण्यात आली. (Building Notice Issue: Residents Hold Meeting with KDMC Officials Following Instructions from Deputy CM Eknath Shinde)

डोंबिवलीच्या आयरे गावातील समर्थ हाईट्स या इमारतीला केडिएमसी प्रशासनाकडून कारवाईची नोटीस बजावण्यात आल्याचे प्रकरण काल समोर आले आहे. महापालिका प्रशासनाकडून इमारतीवर कारवाई झाली तर पुढे काय या विचाराने यातील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमधून बातम्या प्रसारित झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजेश मोरे यांना तातडीने या रहिवाशांची भेट घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आमदार राजेश मोरे आणि उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी काल रात्री समर्थ हाईट्समधील रहिवाशांची भेट घेतली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याशीही फोनद्वारे चर्चा करून कायद्याच्या चौकटीत राहून या रहिवाशांना दिलासा देण्याची सूचना केली.

त्यानुसार आज सकाळी आमदार राजेश मोरे, समर्थ हाईट्समधील रहिवासी आणि केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची एक बैठक संपन्न झाली. ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगत या इमारतीमधील रहिवाशांवर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. तसेच या 65 इमारतींमधील रहिवाशांना क्लस्टर योजनेमध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सर्व जण या सर्व रहिवाशांच्या पाठीशी असल्याचेही आमदार मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या बैठकीला आमदार राजेश मोरे, महापौर ॲड. हर्षाली थविल चौधरी, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे यांच्यासह समर्थ हाईट्समधील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा