
आजच्या म्हणजेच 11 ऑगस्टच्या रात्रीपासून लागू होणार बदल
कल्याण डोंबिवली दि.11 ऑगस्ट
कल्याण शिळ मार्गावर पत्रीपुल ते रूणवाल चौक दरम्यान एम एम आर डी ए प्राधिकरणामार्फत मेट्रो १२ कल्याण तळोजा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या कामाअंतर्गत मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक आणि सुयोग रिजन्सी अनंतम ते व्यंकटेश पेट्रोल पंपादरम्यान मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. हे काम करत असताना परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त
पंकज शिरसाट यांनी या मार्गावर वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे. (Changes in traffic due to Metro 12 girder laying work: Important information for those traveling on Kalyan-Shil route)
त्यानुसार ११ ऑगस्ट २०२५ ते २० ऑगस्ट २०२५ पर्यंत पुढील वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
प्रवेश बंद -१)
शिळ रोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
त्याऐवजी ही वाहने मानपाडा चौक येथुन सर्व्हिस रोडने जावुन पुढे सोनारपाडा चौक येथे पुन्हा सततच्या वाहीनीवरुन पुढे इच्छीत स्थळी जाऊ शकतील.
तसेच २१ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पुढील वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
प्रवेश बंद -१)
कल्याण शिळरोडवरून शिळफाटयाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सुयोग रिजन्सी अनंतम चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
त्याऐवजी ही वाहने सुयोग रिजन्यी अनंतम चौक पीलर नं.११० येथुन उजवीकडे वळण घेवुन कल्याणकडे येणाऱ्या वाहीनीवरुन पीलर नं.१२८ व्यंकटेश पेट्रोल पंपासमोरुन डावीकडे वळण घेवुन सततच्या वाहीनीवरुन पुढे इच्छीतस्थळी जातील.
प्रवेश बंद २)
कल्याण शिळरोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डी.एन.एस. चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :
त्याऐवजी ही वाहने डी.एन.एस. चौक पीलर नं.१४४ येथुन सर्व्हिस रोडने जावुन पुढे सुयोग हॉटेल अनंतम चौक येथुन पुन्हा कल्याण रोडवरुन पुढे इच्छीतस्थळी जाऊ शकतील.
तर हे वाहतूक बदल ११ ऑगस्ट २०२५ पासुन ते २० ऑगस्ट २०२५ रोजी आणि २१ ऑगस्ट २०२५ ते ३१ऑगस्ट २०२५ च्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटे ते सकाळी 5 वाजेपर्यंत अंमलात राहणार असल्याची माहितीही पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
तसेच ही वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.