Home ठळक बातम्या अवघ्या काही मिनिटांत नवा जिल्हाध्यक्ष देणाऱ्या काँग्रेसला 15 दिवसांनी झाली सचिन पोटेंची...

अवघ्या काही मिनिटांत नवा जिल्हाध्यक्ष देणाऱ्या काँग्रेसला 15 दिवसांनी झाली सचिन पोटेंची आठवण

केडीएमसी निवडणुकांच्या प्रचार प्रमुखपदी पोटे यांची नियुक्ती

कल्याण | दि. 11 डिसेंबर :
निवडणुकीच्या तोंडावर केडीएमसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या माजी जिल्हाध्यक्ष **सचिन पोटे** यांच्या जागी काँग्रेस पक्षाने अवघ्या काही मिनिटांतच नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले होते. परंतु, त्याच पक्षाला पोटे यांची आठवण करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यासाठी तब्बल 15 दिवसांचा कालावधी लागला आहे. हे प्रकरण सध्या कल्याण डोंबिवलीतील संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. (Congress Took Just Minutes to Appoint a New District President — But Remembered Sachin Pote Only After 15 Days)

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोटे यांची प्रचार प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती जाहीर करण्यासाठी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रेस नोट दिली गेली नसली, तरी संबंधित पत्र आणि पोटे यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

इतर पक्षांकडून मिळालेल्या मोठ्या ऑफर्स; काँग्रेसची नियुक्ती फक्त बोळवण?

सचिन पोटे यांना गेल्या काही दिवसांत शिवसेना, भाजप आणि काही अन्य पक्षांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून करण्यात आलेली ही नियुक्ती म्हणजे पोटे यांच्या नाराजीत ‘तात्पुरती बोळवण’ करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय तज्ञ स्पष्टपणे सांगत आहेत. पोटे यांना मिळालेल्या त्या मोठ्या प्रस्तावांच्या तुलनेत काँग्रेसने दिलेली ही जबाबदारी कितपत अर्थपूर्ण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

26 नोव्हेंबरचे सामूहिक राजीनामा नाट्य — आणि काँग्रेसची ‘तत्परता’

26 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार
सचिन पोटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते.
या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली होती.
या राजीनाम्यानंतर
सचिन पोटे यांनी इतर पक्षांकडून आलेल्या ऑफर्सकडे दुर्लक्ष करत
पक्षाशी निष्ठा जपत
काँग्रेसची साथ सोडली नाही.
मात्र, त्यांच्या या निष्ठेबाबत काँग्रेस नेतृत्वाने कोणताही ठोस विचार केल्याचे दिसून आले नाही.

उलट, पोटे यांच्या जागी नवे जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी पक्षाने दाखवलेली क्षणभरातली तत्परता,
आणि त्याच पक्षाने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यासाठी घेतलेले 15 दिवसांचे विलंबित पाऊल,
या दोन्ही गोष्टी आधारकाँग्रेसच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

25 वर्षे काँग्रेसला जिवंत ठेवणाऱ्या पोटेंकडे पक्षाने केलेली दुर्लक्ष

2014 पासून केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही
सचिन पोटे यांनी
नागरी समस्या, विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवर
भाजप-शिवसेना नेतृत्वाशी थेट लढा देत काँग्रेसला जिवंत ठेवले.
पोटे यांची आंदोलनशैली, विरोधकांना थेट भिडण्याची तयारी आणि काँग्रेसबद्दलची निष्ठा या गुणांचे
विरोधकांननीही वेळोवेळी कौतुक केले आहे.

मात्र, ज्या पक्षासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला,
त्याच पक्षाने त्यांच्याच आंदोलनांकडे आणि केलेल्या कामांकडे
सोयीस्कर दुर्लक्ष केले.
तेवढेच नव्हे, तर त्यांना पदावरून त्वरित बाजूला करून
निष्ठावान कार्यकर्त्याचा ‘सन्मान’ कसा केला जातो,
याचाही उलट आदर्शच पक्षाने घालून दिला.

सर्वात मोठा प्रश्न — पोटेंना इतकी अपमानास्पद वागणूक का?…

पोटे यांचे पद निवडणुकीच्या तोंडावर काढून घेण्याची घाई का करण्यात आली?
त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवायला इतका उशीर का लागला?
25 वर्षांपासून पक्षाला श्वास देणाऱ्या कार्यकर्त्याला अशी अपमानास्पद वागणूक का दिली गेली?

या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेस नेतृत्वाने देणे आवश्यक आहे. आणि हीच सर्वात मोठी दबक्या आवाजातील चर्चा कल्याण डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा