Home ठळक बातम्या एपीएमसीतील वीजवाहिनीला आग ; संध्याकाळपासून कल्याण शहराचा बहुतांश भाग अंधारात

एपीएमसीतील वीजवाहिनीला आग ; संध्याकाळपासून कल्याण शहराचा बहुतांश भाग अंधारात

 

कल्याण दि.9 ऑगस्ट :
कल्याण पश्चिम येथील एपीएमसी मार्केट मध्ये असलेली मुख्य वेज वाहिनी जळाल्याने कल्याणातील बहुतांश भागांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास या वीज वाहिनीला आग लागल्याची माहिती शाहिद शेख यांनी दिली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भिवंडी येथून ही वीज वाहिनी आली असून त्याद्वारे कल्याण पश्चिम आणि पत्री पूल परिसरातील काही भागांना वीज पुरवठा केला जातो.
दरम्यान संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल ग्राहक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महावितरण कडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याचेही नागरिकांनी सांगितले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एपीएमसी मार्केट, बैलबाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसरासह अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

(Fire in main power line in APMC; Most parts of Kalyan city in darkness since evening)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा