Home ठळक बातम्या डोंबिवलीतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

डोंबिवलीतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

डोंबिवली दि.28 ऑक्टोबर :
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून भाजप पाठोपाठ शिवसेनेमध्येही जोरदार इन्कमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे डोंबिवली शहर पूर्व विभाग ए ब्लॉकचे अध्यक्ष,माजी नगरसेवक सदाशिव शेलार तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोघांसह त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. (Former Congress corporator from Dombivli joins Shiv Sena along with supporters)

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा राज्यभर वेगाने विस्तार सुरू आहे. विकासाभिमुख कार्यपद्धती आणि जनहिताच्या निर्णयांनी प्रेरित होऊन विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

काँग्रेसच्या या दोन्ही माजी नगरसेवकांसह त्यांचे समर्थक अजय शेलार, हिरामण मोरे, दशरथ म्हात्रे, प्रतीक शेलार, पुण्यदान सरोदे, राहुल पढाडे, मोहन भोसले, ख्वाजा शेख, सलील चौधरी, प्रसाद कीर, विशाल म्हात्रे यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नवागतांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कविता गावंड, उपशहरप्रमुख बाळा म्हात्रे, युवासेना अध्यक्ष सागर जेधे, विभाग प्रमुख संदेश पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा