Home ठळक बातम्या गुड न्यूज; नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत केडीएमसी प्रशासनाने वाढवली

गुड न्यूज; नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत केडीएमसी प्रशासनाने वाढवली

इच्छुकांच्या विनंतीमुळे कालावधी वाढवल्याची अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची माहिती

कल्याण डोंबिवली दि.4 जुलै :
केडीएमसीमध्ये तब्बल 490 विविध कार्मिक आणि तांत्रिक पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. त्याचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार 3 जुलै 2025 म्हणजेच आजच संपत होती. मात्र इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार त्यामध्ये आणखी 12 दिवसांची वाढ करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे. त्यामुळे वेळेअभावी ज्यांना अर्ज दाखल करता आले नसतील अशांसाठी आणखी एक संधी महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. (Good news; Administration extends deadline for applying for KDMC job recruitment)

केडीएमसी अर्थातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी बऱ्याच वर्षानंतर नोकर भरती केली जात आहे. त्यासाठी गेल्या 10 जून 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून माहिती देण्यात आली होती. विविध विभागातील तांत्रिक आणि कार्मिक अशी सर्व पदे मिळून 490 जागांसाठी ही भरती केली जात आहे. त्यासाठी टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र यासाठी असलेली 3 जुलै 2025 ची अर्ज दाखल करण्याची मुदत आणखी वाढवण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडे अनेकांचे विनंती अर्ज आले होते. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून ही मुदत 15 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले.

तसेच या पदांसाठी इच्छुक सर्व उमेदवारांनी ही मुदत संपण्यापूर्वीच म्हणजे 15 जुलैपूर्वीच सगळ्यांनी अर्ज दाखल करावे. तसेच ज्यांना कोणाला अर्ज दाखल करताना अडचणी येत असतील त्यांनी संबंधित हेल्पलाइन नंबर किंवा ई मेलद्वारे त्या मांडण्याचे आवाहनही हर्षल गायकवाड यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा