Home ठळक बातम्या अतिवृष्टीचा इशारा : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या 19 ऑगस्ट 2025 रोजी...

अतिवृष्टीचा इशारा : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर

 

ठाणे, दि.16 ऑगस्ट :
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (1 ली ते 12वी पर्यंत) शाळांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. (Heavy rain warning: Holiday declared for schools in Thane district tomorrow, August 19, 2025)

ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा