Home ठळक बातम्या ‘ह्युमॅनिटी स्टिल अ‍ॅलाइव्ह’चा उपक्रम : थर्टी-फर्स्टच्या धामधुमीऐवजी गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब

‘ह्युमॅनिटी स्टिल अ‍ॅलाइव्ह’चा उपक्रम : थर्टी-फर्स्टच्या धामधुमीऐवजी गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब

कल्याण दि.11 डिसेंबर :
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही ‘ह्युमॅनिटी स्टिल अ‍ॅलाइव्ह’ संस्थेतर्फे ३१ डिसेंबरला गरजू आणि निराधार नागरिकांसाठी मानवतावादी उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात या वर्षीही ब्लॅंकेट वाटप, बिस्किट वाटप आणि पिण्याच्या पाण्याचे वितरण करून थंडीच्या काळात गरिबांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. (‘Humanity Still Alive’ Initiative: Spreading Warmth to the Needy Instead of Lavish New Year’s Eve Celebrations)

थर्टी-फर्स्टच्या पार्ट्या, जल्लोष आणि खर्चिक सेलिब्रेशन टाळत संस्था मागील दहा वर्षांपासून समाजासाठी आगळावेगळा उपक्रम राबवत आहे. ‘माणूस हा माणसासाठी’ या भावनेतून गरजूंना मदतीची ऊब मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांनी या वर्षीही संपूर्ण तयारी केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष तेजस रमेश सांगळे म्हणाले, “हे आमच्या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. समाजातील प्रत्येकाने या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे, एकमेकांना सहाय्य करावे, हीच आमची इच्छा. आपल्या छोट्याशा योगदानातून अनेकांच्या आयुष्यात आनंदाची किरणे पोहोचू शकतात.”

इच्छुक नागरिकांनी आपला आर्थिक सहभाग २० डिसेंबर २०२५ पर्यंत खालील अधिकृत जी-पे क्रमांकावर पाठवावा —
📞 जी-पे क्रमांक : ८८९८९३०७८४

संकलित निधीचा उपयोग केवळ सामाजिक कार्यासाठीच करण्यात येणार असून, उपक्रमानंतरचे **फोटोज व व्हिडीओज** सहभागींना पाठविण्यात येतील, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

– ह्युमॅनिटी स्टिल अ‍ॅलाइव्ह

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा