Home ठळक बातम्या गटारी नाही दीप अमावास्या; कल्याणात बालक मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून उत्साहात दिपोत्सव साजरा

गटारी नाही दीप अमावास्या; कल्याणात बालक मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून उत्साहात दिपोत्सव साजरा

 

कल्याण दि.24 जुलै :
आज असलेल्या आषाढ अमावस्येनिमित्त कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे पारंपरिक पद्धतीने ही दिप अमावास्या साजरी करण्यात आली. आपल्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत बालक मंदिर शाळेच्या नूतन वास्तूमध्ये मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा झाला. यावेळी बालक मंदिर संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे, बहुरंगी दिप आणि इतर दिवे आणले होते. (It is Deep Amavasya; Students of Balak Mandir Sanstha in Kalyan celebrate deepotsav with enthusiasm)

या कार्यक्रमाचे उद्घाटन सिनेमार्गदर्शक जगदीश हडप, बालक मंदिर संस्थेचे विश्वस्त मुकुंद जोशी यांच्यासह बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेचे अध्यक्ष रमेश गोरे, मुख्याध्यापिका कल्पना पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आपल्या हिंदू संस्कृतीत दीप किंवा दिव्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे आज असलेल्या दीप अमावस्येनिमित्त शाळेच्या शिक्षक वर्गाकडून अतिशय सुंदर पद्धतीने दिव्यांची सजावट आणि प्रज्वलन करण्यात आले. यामध्ये बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील सुमारे ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गुंजाळ यांनी, पाहुण्यांचा परिचय मंगेश घाटे यांनी करून दिला. संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे स्वागत सुबोध कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे नियोजन पालक शिक्षक संघाचे सचिव प्रकाश पानसरे यांनी केले. यावेळी पालक शिक्षक संघाच्या कोषाध्यक्ष सरिता शेदड, लिखार सर यांनी केले. तर या कार्यक्रमाला संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका कल्पनाताई पवार तसेच ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा मोरे आणि विद्या घुले यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभल्याची माहिती प्रसिद्धी समितीच्या सुबोध कुलकर्णी आणि शशिकांत गवारे यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा