Home ठळक बातम्या रुक्मिणीबाई रुग्णालयावर केडीएमसी आयुक्तांचा सरप्राइज स्ट्राईक : सामान्य नागरिक बनून घेतली रुक्मिणीबाई...

रुक्मिणीबाई रुग्णालयावर केडीएमसी आयुक्तांचा सरप्राइज स्ट्राईक : सामान्य नागरिक बनून घेतली रुक्मिणीबाई रुग्णालयातील यंत्रणेची झाडाझडती

आरोग्य सेवेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

कल्याण दि.7 मे :
कधी औषधे नाहीत, कधी डॉक्टर नाहीत तर कधी अँब्युलन्सच नाही…अशा विविध कारणांमुळे सतत नकारात्मक चर्चेत असलेल्या केडीएमसीच्या रुख्मिणीबाई रुग्णालयावर केडीएमसी आयुक्तांनी आज सामान्य नागरिक बनत अचानक भेट दिली. यावेळी उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णासोबतचा सहकारी बनून त्यांनी रुग्णालयात केसपेपर काढण्यापासून ते ओपीडी, फार्मसी अशा प्रमूख विभागांची पाहणी करून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याणातील रुक्मिणीबाई रुग्णालयासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून येणाऱ्या तक्रारींचा आलेख वाढतच चालला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी महिलेच्या झालेल्या मृत्यूनंतर या रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासह सगळीकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी आज अचानकपणे दिलेली भेट ही महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीमध्ये आपण रुग्णालयातील सर्वच प्रमूख विभागांना भेटी दिल्या आणि सर्व गोष्टी तपासल्या. त्यासोबतच रुग्णालयाच्या कार्यपद्धतीमध्ये काय काय सुधारणा करणे आवश्यक आहे याबाबतही चर्चा केल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आयुक्त अभिनव गोयल हे रुक्मिणीबाई रुग्णालयात तळ ठोकून होते.

या भेटीनंतर आयुक्तांनी दिले हे निर्देश…
ओपीडीमध्ये पेशंटना जलदगतीने डॉक्टर उपलब्ध होण्यासह लवकरात लवकर उपचार मिळाले पाहिजेत,

रुग्णाला औषध देताना आपण आपल्याकडे सर्व औषध मोफत उपलब्ध करून देत असून रुग्णाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही याची काळजी घेणे

ऑपरेशनसाठी आपण काय गोष्टी वाढवू शकतो याबद्दल चर्चा,
डॉक्टर आणि नर्सेस यांच्या राऊंड द क्लॉक ड्युटीबद्दल पाहणी करून सूचना

विशेष करून डॉक्टरांनी रुग्णालयातून पेशंटला अनावश्यक इतर रुग्णालयात नेण्याचा सल्ला देऊ नये. याची खबरदारी आपल्या डॉक्टरांनी घेणे आवश्यक आहे.

मात्र गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेफरल जलदगतीने आणि वेळेवरच झाले पाहिजे ॲम्बुलन्समार्फत…

यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी दिपा शुक्ला यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून त्यांना यासाठी एक सिस्टम तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच ही सिस्टम योग्य पद्धतीने चालते की नाही याची दररोज पाहणी करून रिपोर्टही सादर देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा