
सर्वाधिक आणि अत्यल्प मतांनी विजयी उमेदवारांचे निकाल
कल्याण डोंबिवली दि.17 जानेवारी :
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सार्वत्रिक निवडणुकीत काही प्रभागांमध्ये प्रचंड मताधिक्याने विजय तर काही ठिकाणी अत्यल्प मतांनी निकाल लागल्याचे चित्र समोर आले आहे. मतमोजणीअंती जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार पुढीलप्रमाणे सर्वाधिक आणि अत्यल्प विजयी मताधिक्याचे निकाल आहेत. (KDMC Elections: One Candidate Wins by a Massive 14,000 Votes, While Another Turns the Tables with Just 6 Votes)
🏆 सर्वाधिक विजयी मताधिक्य
1. जयवंत भोईर, शिवसेना पी
पॅनल क्र. 1 (D) – 14 हजार 107 मतांचे मताधिक्य
2. खुशबू पद्माकर चौधरी ,भाजप-
पॅनल क्र. 20 (C) – 13 हजार 28 मतांचे मताधिक्य
3. गजानन मोतीराम पाटील,शिवसेना –
पॅनल क्र. 31 (D) – 12 हजार 718 मतांचे मताधिक्य
4. नविन अनंत गवळी,शिवसेना – पॅनल क्र. 18 (C) 12 हजार 55 मतांचे मताधिक्य
5. मंदार श्रीकांत हळबे, भाजप – पॅनल क्र. 26 (D) – 11 हजार 948 मतांचे मताधिक्य
⚖️ अत्यल्प विजयी मताधिक्य..
1. निलेश अशोक खंबायत,शिवसेना उ.बा.ठा. – पॅनल क्र. 16 (A) – अवघ्या 6 मतांनी विजय
2. नमिता मयूर पाटील,शिवसेना – पॅनल क्र. 4 (C) – 8 मतांनी विजय
3. समिना सलीम शेख (काँग्रेस) – पॅनल क्र. 8 (B) – 38 मतांनी विजय
4. तेजश्री हेमंत गायकवाड शिवसेना(UBT) पॅनल क्रमांक 4(A) – 54 मतांनी
5. विशाल गारवे,शिवसेना उ.बा.ठा.- पॅनल क्र. 10 (B) 172 मतांनी विजय
6. माधुरी प्रशांत काळे (शिवसेना)
पॅनल क्र. 15 (C) – 293 मतांनी* विजय
या निकालांवरून केडीएमसी निवडणुकीत काही प्रभागांमध्ये काही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसते, तर काही ठिकाणी चुरशीच्या लढतीत अवघ्या काही मतांनी निकाल बदलले. यामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात रणनीती, संघटन आणि जनसंपर्कावर अधिक भर दिला जाईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
— माहिती सौजन्य: पवन यादव, एलएनएन सिटीझन रिपोर्टर
























