
टिटवाळा दि.18 जुलै :
महापालिका परिक्षेत्रातील नागरीकांना रस्त्यावरील वाहतुकीतून मार्गक्रमण करणे सुलभ व्हावे, या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी आपल्या पथकासह अ प्रभाग क्षेत्र परिसरात रस्त्यावरील अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई केली. (KDMC’s “A Ward Area” has taken a drastic action to evict encroachments on the roads; however, no time was found in the remaining wards)
यामध्ये वाजपेयी चौक ते टिटवाळा स्टेशन परिसर ते निमकर नाका येथे केलेल्या कारवाईत रस्त्यावरील 5 हातगाड्या, 4 टपऱ्या, 2 SS केबिन, 15 अनधिकृत बोर्ड, 15 MS जाळी, पदपथावर असलेले 13 शेड्स तसेच पदपथावर असलेल्या 15 अनधिकृत ओट्यांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अ प्रभागातील कर्मचारी, आरटीओ, टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि 2 जेसीबी, 2 डंपर आणि 20 मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणं इतर प्रभागातही असून त्याठिकाणी अशा प्रकारची कारवाईला कधी मुहूर्त सापडणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.